माघ पौर्णिमा यात्रा उत्सव
देवस्थानाची वर्षातील सर्वात मोठी यात्रा. मुंबई, पुणे व परदेशातील ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील हजारो भाविक श्रींच्या दर्शनासाठी उपस्थित राहतात.
उत्सव व यात्रा
श्री कुलस्वामी खंडेराय देवस्थान, वडज येथे वर्षभर साजरे होणारे प्रमुख उत्सव, यात्रा, सामूहिक विवाह सोहळे व दैनंदिन उपासना.
उत्सव व यात्रा
देवस्थानाची वर्षातील सर्वात मोठी यात्रा. मुंबई, पुणे व परदेशातील ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील हजारो भाविक श्रींच्या दर्शनासाठी उपस्थित राहतात.
भक्त सदानंद चव्हाण यांना झालेल्या दृष्टांताच्या स्मृतीनिमित्त पादुकांची पालखी मिरवणूक काढली जाते व बोरीच्या झाडातील मूळ स्थानाची विशेष पूजा होते.
विजयादशमीच्या दिवशी देवस्थानात विशेष अभिषेक, शस्त्रपूजन, सीमोल्लंघन व महाआरती पार पडते. भाविक आपट्याची पाने अर्पण करून दर्शन घेतात.
नंदी सभामंडपात अखंड हरिनाम सप्ताह, नामवंत कीर्तनकारांचे हरिकीर्तन, भजन, हरिपाठ व काल्याचे कीर्तन भक्तिभावाने संपन्न होते.
देवस्थान ट्रस्टतर्फे सर्वसामान्य कुटुंबांसाठी अत्यंत कमी खर्चात सामूहिक विवाह सोहळे आयोजित केले जातात; दरवर्षी सुमारे ६०० विवाह संपन्न होतात.
दररोज पहाटे ५:०० ते सायं. ७:३० दर्शन खुले असते. त्रिकाल आरती व कौल तसेच दर रविवारी, सोमवारी व अमावास्येला विशेष अभिषेक-दर्शन होते.
| सोहळा / उपक्रम | हिंदू तिथी / वेळ | प्रमुख विधी व वैशिष्ट्ये |
|---|---|---|
| माघ पौर्णिमा यात्रा | माघ शुद्ध पौर्णिमा | वर्षातील सर्वात मोठी यात्रा, महासभिषेक, पालखी मिरवणूक व महाप्रसाद |
| चंपाषष्ठी उत्सव | मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी | पादुकांची पालखी मिरवणूक, भंडारा-खोबरे उधळण, दीपमाळ प्रज्वलन |
| दसरा (विजयादशमी) | आश्विन शुद्ध दशमी | विशेष अभिषेक, शस्त्रपूजन, सीमोल्लंघन व महाआरती |
| अखंड हरिनाम सप्ताह | वार्षिक परंपरा | हरिकीर्तन, भजन, हरिपाठ व काल्याचे कीर्तन |
| सामूहिक विवाह सोहळे | जाहीर मुहूर्तानुसार | इ.स. १९७६ पासून परंपरा — दरवर्षी सुमारे ६०० विवाह संपन्न |
| त्रिकाल आरती व कौल | दररोज (५:०० ते ७:३०) | स. ६:००, दु. ११:३०, सायं. ४:३० (कौल) व सायं. ७:०० संध्या आरती |